लहंगा चोली हे महिलांचं आवडतं प्रावरण. लग्न किंवा समारंभाच्या निमित्ताने लेहंगा चोलीची खरेदी होते. हे कपडे नेहमी वापरले जात नाहीत. लग्न किंवा घरगुती समारंभाच्या निमित्ताने महागडे कपडे खरेदी केले जातात आणि त्यांचा वापरही दोन ते तीन वेळाच होतो. मात्र याच लेहंगा चोलीचा वापर वेगवेगळ्या पद्धतींनी करता येईल. कसा? पाहू या.
- लेहंगा चोलीसोबत छानसा दुपट्टाही येतो. हा दुप्पट्टा मिक्स मॅच करून वापरता येईल. एखाद्या इव्हिनिंग गाऊन किंवा अनारकली सूटसोबत हा दुपट्टा कॅरी करता येईल. पेहरावात वैविध्य आणण्यासाठी इतर सलवार कमीझसोबत हा दुपट्टा घेता येईल.
- लेहंगा आणि क्रॉप टॉप असा इंडो वेस्टर्न लूक कॅरी करता येईल. इतकंच नाही तर लेहंगा आणि लाँग कुर्ता अशी फॅशन असल्यामुळे लाँग कुर्त्यासोबत लेहंगा घालता येईल.
- लेहंग्याला साजेसं कापड घेऊन इव्हिनिंग गाऊनही शिऊन घेता येईल. लेहंगा आणि या कापडापासून छानसा गाऊन शिवून मिळेल. ही स्टाईल खूप छान दिसेल.
- लेहंग्याच्या चोलीचा वापर ब्लाउजसारखा करता येईल. हेवी वर्कवाला ब्लाउज प्लेन साडीसोबत मॅच करता येईल किंवा वर्कवाल्या साडीवरही हा ब्लाउज घालता येईल.
- लेहंग्याचा दुपट्टा खूपच हेवी असेल आणि प्रत्येक वेळी तो कॅरी करणं शक्य नसेल तर त्याऐवजी श्रगही घालता येईल. लेहंगा चोलीवर श्रग शोभून दिसतं.