ऑनलाईन टीम / वर्धा :
एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला भरचौकात पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची घटना हिंगणघाट परिसरातील नंदेरी येथे आज सकाळी साडेसात वाजता घडली. शिक्षिकेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.
याप्रकरणी आरोपी विकी नगराळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका महाविद्यालयात शिक्षिका आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी ती बाहेर पडली. ही शिक्षिका घराबाहेर पडल्यापासून आरोपी तिच्या मागावर होता. त्याने भरचौकात संधी साधत पेट्रोल ओतून तिला पेटविले. त्यानंतर आरोपी पसार झाला. शिक्षिकेने आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या शिक्षिकेची प्रकृती गंभीर आहे. तिचा चेहरा जळाला असून, वाचाही गेली आहे. दृष्टी जाण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. हिंगणघाट पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.