ऑनलाईन टिम / बेंगळूर
चेन्नईतील एका मॉलवर दहशतवाद्यांनी कब्जा केला असून विजय, जो वीरराघवन नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारत आहे तो कसा या दहशतवाद्यांचा सामना करतो, याभोवती हे कथानक फिरत आहे, हा एक हाय-अॅक्शन थ्रिलर असून पूर्वी 13 एप्रिल चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आहे.
डॉक्टर फेम नेल्सन यांनी दिग्दर्शित केलेल्या बीस्टमध्ये पूजा हेगडे, अभिनेता-दिग्दर्शक सेल्वाराघवन, योगी बाबू, शाइन चाको, रेडिन किंग्सले, अपर्णा दास आणि व्हीटीव्ही गणेश यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनिरुद्ध रविचंदर हे या चित्रपटाचे संगीतकार असून साउंडट्रॅकमधील ‘अरबी कुथू’ आणि ‘जॉली ओ जिमखाना’ ही दोन गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत.
याअगोदर विजय आपल्या शेवटच्या मास्टर या चित्रपटमध्ये दिसला होता. लोकेश कनागराज दिग्दर्शित, चित्रपट गेल्या वर्षी पडद्यावर आला आणि या ना कारणाने चर्चेत राहुन व्यावसायिक यश मिळवले. विजय तेलुगू दिग्दर्शक वामसी पैडिपल्ली यांच्यासोबत एका नविन प्रकल्पावर काम करत आहे.