वखार भाग येथील घटना
प्रतिनिधी / मिरज
मिरजेतील वखार भाग येथे मंगळवारी दुपारी तीन वाजता विजेच्या तारेचा स्पर्श होऊन ठिणग्या कडब्यावर पडल्याने धावत्या ऊसाच्या ट्रॉलीला आग लागून ट्रॉलीतील कडबा जळून खाक झाला. ट्रॅक्टर चालकाने प्रसावधान राखल्याने यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नाही. अग्निशन जवानांनी पाण्याचा फवारा मारून आग वीझवली.
मल्लेवाडी येथून कडबा भरून ट्रॅक्टर दत्तवाड याठिकाणी जात होता. वखार भाग याठिकाणी आल्याने विजेच्या तारेचा स्पर्श होऊन ठिणग्या कडब्यावर पडल्या. त्यामुळे कडब्याने पेट घेतला. मात्र ट्रॅक्टर चालकाला यांची माहिती नसल्यामुळे त्याने ट्रॅक्टर तसाच पुढे नेला. मात्र नागरिकांनी याची माहिती दिल्याने ट्रॅक्टर चालकांने ट्रॅक्टरच्या कडबा असलेली अन्य एक ट्रॉली बाजूला केली. याबाबत महापालिका अग्निशमन दलाने धाव घेत तातडीने आग विझवली.