ग्राहक-कॉन्ट्रक्टरमधून मागणी : विद्युत मिटरचा फोटो वापरणे
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व ग्रामीण भागासाठी यापूर्वी स्वतंत्र मीटर विक्री केंद्र सुरू होते. यामुळे मीटरचा सुरळीत पुरवठा होत होता. परंतु सध्या शहरातील एकच केंद्र सुरू असल्याने त्यांच्यावर भार वाढला आहे. त्यामुळे बऱयाचवेळा मीटर उपलब्ध होण्यास अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे शहर व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र मीटर विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
मीटर उपलब्ध करून देण्यासाठी एका कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. कंपनीकडून आलेले मीटर कंत्राटदार ग्राहक व कॉन्ट्रक्टरपर्यंत पोहचत होते. परंतु काही दिवसातच कोणतेही कारण न देता ग्रामीण भागासाठी असणारे केंद्र बंद करण्यात आले. वारंवार मागणी करूनही ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहक शहरात येऊन मीटर घेऊन जावू लागले. यामुळे मीटर मिळण्यास समस्या निर्माण होऊ लागल्या. मीटरसाठी आठवडाभर वाट पाहावी लागत होती.
मीटर देण्यासाठी कंत्राट देण्यात येत असले तरी त्यावर हेस्कॉमचे नियंत्रण असते. परंतु अधिकाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मीटरच्या समस्या वाढल्या होत्या. कॉन्ट्रक्टर असोसिएशनने या विरोधात जोरदार आवाज उठविल्यानंतर आता पुन्हा सुरळीत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. परंतु ग्रामीण भागासाठी स्वतंत्र केंद्र उपलब्ध नाही. प्रत्येक महिन्याला सुमारे 8 हजारच्या जवळपास रेल्वे स्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयात विक्री करण्यात येतात. त्यामुळे शहर आणि ग्रामीण अशी दोन केंदे सुरू केल्यास मीटर मिळणे सोपे होणार आहे.
ग्रामीण भागासाठी केंद्र सुरू झाल्यास भार कमी होणार
आर. एम. कुंटे (अध्यक्ष, इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टर असोसिएशन)
एकच विक्री केंद सुरू असल्यामुळे ग्राहकांना मीटर मिळण्यासाठी वाट पाहावी लागत होती. सध्या विक्री कंत्राटदाराकडून मीटर विक्री सुरळीत करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागासाठी केंद्र सुरू झाल्यास शहर विक्री केंद्रावरील भार हलका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.