प्रतिनिधी / लांजा
कोविड19 या महामारीत ग्रामकृती दल आणि नागरी कृती दलातील लांजा तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचारी याना आज (मंगळवार) पासून कार्यमुक्त करण्याचे आदेश लांजा गट विकास अधिकारी यशवंत भांड यांनी दिल्याने शिक्षक वर्गाला दिलासा मिळाला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार लांजा यांच्या आदेशानुसार लांजा गट विकास अधिकारी यांनी लांजा पंचायत समिती अधिनस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ( कोरोना ड्युटी करणाय) ग्रामकृती दलातील आणि लांजा नगर पंचायत हद्दीतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यावेळी लांजा सभापती लीला घडशी, गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय सुपनूर,प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश केसरकर, माध्यमिक मुख्यधपक संघटना चे गणपत शिर्के उपस्थित होते. ग्राम कृती दल व नागरी कृती दलातील शिक्षकांचे आदेश रद्द व्हावेत यासाठी आज सकाळी सभापती लिला घडशी मॅडम, गटविकास अधिकारी यशवंत भांड साहेब व गटशिक्षणाधिकारी मा.डॉ. डी.बी.सोपनूर साहेब यांची एकत्रित भेट झाली.
यावेळी सर्व आदेश रद्द करुन तसे पत्र लागलीच काढण्याची ग्वाही भांड व सोपनूर यांनी दिली आदेश रद्द करण्यासंदर्भात सभापती घडशी मॅडम, भांड साहेब व सोपनूर साहेब यांनी तत्परता दाखवून कार्यवाही केल्याबद्दल शिक्षक समिती ने सर्व शिक्षकांना वतीने धन्यवाद दिले आहेत.