ऑनलाईन टीम / मुंबई :
नकारात्मक संकेतामुळे गुरुवारी शेअर निर्देशांकांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात 230 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 71 अंकांनी घसरला. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात 19 पैशांचे अवमूल्यन झाले.
दरम्यान, सध्या भारतीएअरटेल, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, एलअँडटी, मारुती, पॉवरग्रीड,टेक महिंद्रा, ऍक्ससि बँक हे शेअर तेजीत आहेत. तर ओएनजीसी, इन्फोसिस, टाटा स्टील, आयटीसी, नेस्ले, रिलायन्स एसबीआय हे शेअर घसरले आहेत.