आचरा प्रतिनिधी
गेले चार दिवस बरसणाऱ्या पावसाने आचरासह इतर गावात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. आचरा परवाडी, हिरलेवाडी, चिंदर लब्देवाडी येथे नदीच्या पुराचे पाणी आल्याने या भागातील भातशेती पाण्याखाली गेली होती तर आचरा पारवाडीत काही घराना वाढलेल्या पाण्याने धोका निर्माण झाला होता आचरा पारवाडी नदीला दुपारनंतर पाणी आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आचरा सरपंच प्राणया टेमकर यांनी आचरा पारवाडीत दाखल होत पाहणी करत परिस्थितीवर लक्ष ठेऊन होत्या. ओहोळाना पाणी आल्याने वायंगणी आचरा हिरलेवाडी अशी वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
आचरापार नदीला दुपारनंतर पाणी आल्याने नदीचे पाणी आचरा पारवाडीतील शेतीत घुसून सुमारे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली होती. नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढून आचरा पारवाडीतल काही घरांना पाण्याने वेढा घातला होता पारवाडीतील केदार शिर्के, गुरुनाथ आपकर यांच्या घरांना तर सदानंद साळकर यांच्या शेतमंगराला पाण्याने वेढले होते. पारवाडीतीत ग्रामस्थ घराबाहेर रस्त्यावर जमा होऊन परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.
चिंदर लब्देवाडी, आचरा हिरलेवाडी येथील भातशेतीत खाडीचे पाणी घुसल्याने शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली होती. पुराच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने शेतीत असलेले साहित्य सुरक्षित स्थळी आणताना शेतकऱ्यांची तारांबळ होती. वायंगणी येथील ओहळाचे पाणी रस्त्यावर आल्याने वायंगणी हिरलेवाडी येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच आचरा मालवण रस्त्यावर कांबळी यांच्या रिसोर्ट जवळही ओहोळाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता
Previous Articleसातारा जिल्ह्यात आज २७ जणांना डिस्चार्ज तर ७ जण पॉझिटिव्ह
Next Article पंतप्रधान मोदींच्या लेह भेटीचा अन्वयार्थ
Related Posts
Add A Comment