पुणे / प्रतिनिधी :
सुर संजीवन म्युझिक थेरीप ट्रस्ट तर्फे आंतर राष्ट्रीय किर्तीचे सतारवादक चिंतन कट्टी यांचे सतारवादन व पुण्याचे सुप्रसिद्ध कलाकार पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी तबला आणि संवादिनीची संगत स्वप्नील भिसे आणि सिद्धेश बिचोलकार करणार आहेत.
हा संगीत सोहळा व पदवीप्रदान समारंभ रविवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नवी पेठ स्थित एस. एम. जोशी सभागृह येथे होणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
कार्यामाचे सुत्रसंचालन मधुरा गदे करणार आहेत. या वेळी संगीतोपचाराच्या पदविका परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रस्टचे कार्यकारी ट्रस्टी पं. शशांक कट्टी यांच्या हस्ते पदविका देणार आहेत.