प्रतिनिधी / बेळगाव
सदाशिवनगर येथील एका दहावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
सुजल राजू कळ्ळीगुद्दी (वय 16) रा. सदाशिवनगर 9 वा क्रॉस असे त्याचे नाव आहे. सुजल हा दहावीचा विद्यार्थी होता. लॉकडाऊनमुळे दहावीची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला अभ्यास करण्यास सांगितले. याच मनस्तापातून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी मध्यरात्री 12.30 ते रविवारी सकाळी 6 या वेळेत ही घटना घडली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झालेली आहे. सुजलचे कुटुंबीय मूळचे गोकाक तालुक्मयातील कोळवी गावचे असून तो शर्मन्स हायस्कूलचा विद्यार्थी होता. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.