दोडामार्ग : आज दिनांक ३१ऑक्टोबर २०२० रोजी दोडामार्ग पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननिय श्री.सुनिल थोपटे साहेब व दोडामार्ग पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय श्री. बागल साहेब या दोन्ही कर्तव्यदक्ष आणि समाजप्रिय अधिकाऱ्यांचा श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दोडामार्गच्या धारकऱ्यानीं डबडबलेल्या नेत्रांनी निरोप घेतला. गेल्या दोन वर्षांत साहेबांनी केलेली मदत, श्री शिवप्रतिष्ठानच्या विविध कार्यक्रमातील त्यांचा सक्रीय व मार्गदर्शन सहभाग आणि त्यांची तरुणांच्या पाठीशी असलेली खंबीर साथ सदैव आमच्या स्मरणात राहील.
दोन्ही साहेबांना बदली स्थळी सुखरुप पोहचण्यासाठी व पुढील आयुष्यासाठी सर्व धारकऱ्यानी हार्दिक शुभेच्छा देऊन शिवप्रतिमा भेट दिली.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच दोडामार्गचे प्रमुख मंगेश पाटील, प्रकाश गवस, विठ्ठल गवस, सुयश गवस, तुकाराम गवस आदी सर्वजणांचे साहेबांनी आभार मानले.
Trending
- आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून औपचारिक सुरुवात
- विशेष अधिवेशनाची फलद्रूप समाप्ती
- भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गड्यांनी विजय
- दहशतवाद्यांना मदत करणारा डीएसपी श्रीनगरमध्ये गजाआड
- टाटा मोर्ट्सचा इलेक्ट्रिक मिनी ट्रक लाँच
- महिला आरक्षणाने भारताचे भवितव्य पालटणार
- भारत 2024 मध्ये 6.5 टक्के विकासदर साध्य करेल
- अंबानींनी एका दणक्यात 15000 कोटी गमावले