वार्ताहर / झुआरीनगर
सांकवाळ येथील श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह साखळय़ो संस्थानच्या 50 व्या वर्धापनदिनी महाजन तसेच भाविकांनी घरोघरी पणत्या प्रज्वलीत करून वर्धापन दिन साजरा केला.
सोमवारी रात्री 8.45 मि. जेव्हा देवीची पालखी निघेल त्याचवेळी सर्व महाजन तसेच भाविकांनी आपल्या घराच्या व्हरांडय़ात तसेच तुळशी वृंदावनासमोर समई पेटवून देवीची आराधना करावी असा संदेश समाज माध्यमाद्वारे सर्वांना पाठविण्यात आला आणि सर्व महाजनांनी यावेळी घरोघरी पणत्या पेटवून हा उत्सव साजरा केला. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा हा सुवर्ण महोत्सव रद्ध करावा लागला याची खंत आहे. परंतु पुढील वर्षी येणारा देवाचा 51 वा वर्धानदिन अधिक मोठय़ा उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्याचा विचार सर्वांनी यावेळी बोलून दाखवला.