सभासद नोंदणीला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
सांगली/प्रतिनिधी
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली येथे जिल्ह्यातील नवनिर्वाचित युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, यापुढील राजकीय वाटचाल व पक्षवाढीसाठी करावयाची कार्ये यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. तसेच काँग्रेस पक्ष सभासद नोंदणीसाठीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून, त्यासंदर्भात पक्ष सभासदांची संख्या वाढावी यासंबंधी नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
चर्चेप्रसंगी मिरज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, राज्य युवक काँग्रेस प्रदेश सचिव सावनकुमार दरुरे, सांगली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज सरगर व पदाधिकारी उपस्थित होते.