प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील आरग येथे मंगसुळी रस्त्यावरील घर फोडून अज्ञात चोरटयांनी सुमारे दिड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत सुरज शिशुपाल कांबळे, (वय २९) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सुरज कांबळे यांचे आरग गावापासून काही अंतरावर असलेल्या मंगसुळी रस्त्यावर मातोश्री निवास नावाचे घर आहे. सोमवार ५ रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप कशाने तरी तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.