सांगली / प्रतिनिधी
पुरोहित चेस अकॅडमी, सांगली आणि चेसनट अकॅडमी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये इराणचा फिडे मास्टर शाहीन सादेह हा विजेता ठरला. त्याने ९८ गुणांसह विजेतेपद पटकावले. इराणचाच मानांकित खेळाडू फाहीर नवाझ अली हा ८७ गुणांसह उपविजेता ठरला. बिहारचा मानांकित खेळाडू देवी दयाल सिंग यास ५८ गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झाले. आंध्रप्रदेशचा मानांकित खेळाडू संकर रेड्डी यास ५७ गुणांसह चौथे स्थान प्राप्त झाले. गुजरातचा मानांकित खेळाडू निलेश गुप्ता यास ५७ गुणांसह पाचवे स्थान प्राप्त झाले.
पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तसेच औरंगाबाद येथील नामांकित खेळाडू आणि प्रशिक्षक अमरदीप तिवारी यांच्या मार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. तांत्रिक पंच म्हणून चंद्रशेखर कोरवी, दीपक वायचळ आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले.