प्रतिनिधी / सांगली
शहरातील पुष्पराज चौक येथील बाल निरीक्षण गृहातील चार अल्पवयीन मुलांनी पलायन केले आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पलायन केलेले चारही अल्पवयीन मुले एका गुन्ह्यात संशयित म्हणून होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना या निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. या निरीक्षणगृहाच्या पाठी मागील बाजूच्या भिंतीचे काम सुरू आहे. या भिंतीवरून उडी मारून या चौघांनी पलायन केले आहे. या चौघांचा शोध सुरू आहे. याबाबत निरीक्षणगृहाच्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे याची नोंद केली आहे.