महापौरांचा आक्रमक पवित्रा; मनपा आयुक्तांना पत्र
प्रतिनिधी / सांगली
नुकत्याच झालेल्या ऑनलाईन विशेष महासभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या त्या ‘गोंधळी’ नगरसेवकांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे भाजपचे २० हून अधिक नगरसेवक कारवाईच्या कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. महापौरांच्या पत्रांवर आयुक्त काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुंठेवारी समिती गठीत करणे, प्रभाग समित्यांची पुनर्रचना करणे असे दोन विषय अजेंड्यावर घेत २६ मार्च रोजी विशेष महासभेचे ऑनलाईन अॅपद्वारे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरळीत सुरु असताना ‘लिंक मिळाली नसल्याचा आरोप करत भाजपच्या २० हून अधिक सदस्यांनी सभागृहात एकत्र येत गोंधळ घालत सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. महापौरांनी वारंवार विनंती करुनही भाजपच्या सदस्यांनी गोंधळ थांबवला नाही. याची गंभीर दखल महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी घेतली आहे. भाजपच्या त्या गोंधळी नगरसेवकांच्यावर कायदेशीर कारवाई करा. अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले आहे. यामध्ये शुक्रवार २६ मार्च रोजी महापालिका विशेष सभेचे उपसचिव, नगरविकास विभाग यांचेकडील पत्रान्वये ऑनलाईन अॅपद्वारे आयोजन केले होते. सभेचे कामकाज सुरळीत सुरु असताना भाजपचे काही सदस्य सभागृहात घुसले.
ऑनलाईन सभेचे लिंक मिळाली नाही. रेंज मिळत नाही अशा तक्रारी केल्या. तसेच संगणकाच्या वायरीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. सभेचे लिंक देतो, अशी वारंवार विनंती केली. मात्र काहीही ऐकूण न घेता भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. सभेच्या कामकाजात अडथळा आणला. संभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या सदस्यांचे ह वर्तन शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे भाजपच्या गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली आहे.