प्रतिनिधी/सांगली
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. पूरपट्टÎातील नागरिकांना वेळीच स्थलांतर करण्याच्या नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. बुधवारी उपायुक्त राहूल रोकडे यांनी सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी येथे प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना स्थलांतराचे आवाहन केले. पूरस्थिती उद्भवली तर महापालिकेची आपत्ती नियंत्रण यंत्रणा सज्ज आहे. पूरपट्टÎात 11 ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेरे बसविले आहेत, तर पाच ठिकाणी बोटींग स्टेशन सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2019 च्या ऑगस्टमध्ये आलेल्या महापूरामध्ये अर्ध्याहून अधिक सांगली शहर पाण्यात गेले होते. संपूर्ण पूरपट्टाही पाण्याखाली होता. अंदाज न आल्याने अनेक नागरिक अडकले, अनेकांचे संसार बुडाले. प्रयत्नांची शर्थ करुन नागरिकांना पाण्याबाहेर काढले होते. महापुराचा हा अनुभव लक्षात घेत महापालिका प्रशासन अलर्ट झाले आहे. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 31 फुट झाल्यानंतर सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट तसेच मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी शिरते. येथील नागरिकांना वेळीच स्थलांतराच्या सूचना मनपाने दिल्या आहेत.
या परिसरात राहणाऱया जवळपास 40 हून अधिक कुटूबांना नोटीसा बजाविल्या आहेत. बुधवारी उपायुक्त राहूल रोकडे, अग्नीशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, सहायक आयुक्त अशोक कुंभार, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांनी सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी येथे जात नागरिकांशी संवाद साधला. संभाव्य पुराचा धोका सांगून कोरोना परिस्थितीमुळे निवारा केंद्राची होणारी अडचण लक्षात घेत आतापासूनच नियोजन करावे. नुकसान टाळावे, असे आवाहनही केले.
11 सीसीटीव्ही, 5 बोटींग स्टेशन
महापुरासारख्या आपत्तीस तोंड देण्यास महापालिका आपत्ती नियंत्रण यंत्रणा सज्ज आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय पूरस्थिती उद्भवली तर पूरपट्टÎावर वॉच ठेवण्यासाठी 11 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सांगली व मिरजेत पाच ठिकाणी बोटींग स्टेशन सुरु करण्यात येणार आहे. राहूल रोकडे, उपायुक्त. सांगली.
इथे असणार बोटींग स्टेशन
1) कर्नाळ पोलिस चौकी
2) टिळक चौक
3) शंभरफुटी रस्ता
4) सांगलीवाडी जुना जकात नाका
5) कृष्णा घाट, मिरज.