दादा मुलाणी व प्रवीणकुमार यांच्यात प्रमुख लढत
वार्ताहर /सांबरा
सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी प्रवीण कुमार हरियाणा विरूद्ध कुर्डुवाडी आखाडय़ाचा दादा मुलाणी यांच्यात होणार आहे.
दुसऱया क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार वि. मोतीबाग तालीम कोल्हापूरचा अरूण भोंगार्डे, तिसरी कुस्ती शाहुपुरी तालीम कोल्हापूरचा अमोल बागव वि. शिवराय आखाडा कुर्डुवाडीचा शुभम मुसळे यांच्यात होणार आहे. चौथी कुस्ती रोहित कंग्राळी वि पवन चिकदिनकोप, पाचवी कुस्ती विक्रम शिनोळी वि. सुनील कवठेपिरान, सहावी कुस्ती निरंजन येळ्ळूर वि. अजिंक्य सांगली, सातवी कुस्ती महादेव दऱयान्नावर वि. प्रेमनाथ कंग्राळी, आठवी कुस्ती प्रवीण निलजी वि. रणजीत सांगली, नववी कुस्ती पंकज चापगांव वि. संकल्प कंग्राळी, दहावी कुस्ती ओमकार सावगाव वि. गणेश कडोली यांच्यात होणार आहे.
त्याचप्रमाणे कुबेर पिरनवाडी वि. शुभम कंग्राळी, महेश तीर्थकुंडे वि. राहुल किणये, वैभव सांबरा वि. रोहित माचीगड, किसन कंग्राळी वि. रोहन कडोली, ओमकार मुतगा वि. राहुल माचीगड यांच्यात आकर्षक कुस्त्या होणार आहेत. यासह इतर अनेक चटकदार कुस्त्या या मैदानात होणार आहेत. तसेच महिला कुस्त्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. येथील विमानतळालगतच्या मैदानावर कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार असून कुस्तीगीर कमिटी जय्यत तयारी करत आहे.