प्रतिनिधी / नागठाणे :
बोरगाव पोलिसांनी अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईत १६४२ रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.या प्रकरणी विकास सदाशिव सावंत (वय ४२, रा. वेणेगाव) व हजरफ हनिफ सुतार (वय ३८, रा. सासपडे) या दोघाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुधवारी सायंकाळी या दोन्ही कारवाया करण्यात आल्या.सासपडे येथे हजरफ सुतार हा चोरटी देशी दारू विकत असल्याची माहिती मिळल्यावरून त्याच्यावर छापा टाकून पोलिसांनी ७८० रुपये किमतीच्या १५ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.तर वेणेगाव येथील विकास सावंत याच्याजवळून ८३२ रु किमतीच्या १६ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या .स.पो.नि डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर, हवालदार मनोहर सुर्वे,राजू शिखरे,विशाल जाधव,राजू शिंदे,व महिला पोलीस तेजस्विनी जगताप यांनी ही कारवाई केली.