मसूर / वार्ताहर :
हणबरवाडी गावची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल विजयी उमेदवार व निवडणुकीतून माघार घेतलेल्या अर्जदारांचा सत्कार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या निवासस्थानी करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवार नारायण शंकर शेडगे, संजय मारुती पवार, प्रकाश आनंदराव कुंभार, दत्तात्रय नामदेव पवार, प्रल्हाद आनंदराव कुंभार, यशोदा संतोष कोळेकर, कल्याणी सुनिल घाडगे, जयश्री राजेंद्र शेडगे, दीपाली अशोक पवार या विजयी उमेदवारांचे सत्कार झाले.
मसूर ग्रामपंचायत सरपंच पंकज दिक्षीत, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष सिकंदर शेख, हणबरवाडी ग्रामपंचायत पॅनेल प्रमुख हणमंतराव शेडगे, जाधव गुरुजी, हणबरवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच सुनिल घाडगे, रामचंद्र पवार, भानुदास निगडे, सत्यवान शेडगे, विठ्ठल शेडगे, सोपान शेडगे, लक्ष्मण शेंडगे, गजानन शेडगे आदी यावेळी उपस्थित होते.