ऑनलाईन टीम / सातारा :
अत्याचाराच्या गुह्यातील संशयित अल्पवयीन मुलाने आज सकाळी साताऱ्यातील बालसुधारगृहात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. नात्यातल्याच एका युवतीवर आत्याचार केल्याप्रकरणी वडूज पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती.
आत्महत्या केलेला संशयित अल्पयीन मुलगा खटाव तालुक्यातील रहिवाशी असून, त्याच्याच नात्यातील एका युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. काही दिवसांपूर्वी वडूज पोलिसांनी त्याची रवानगी साताऱ्यातील बालसुधारगृहात केली होती. दरम्यान, आज सकाळी त्याने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी बालसुधारगृहाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल दाखल झाल्या असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.