प्राणलिंग स्वामीजी यांचे प्रतिपादन : यमगर्णीत वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांना श्रद्धांजली
वार्ताहर / निपाणी
भारतीय जवान सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. म्हणूनच आपला देश व आपण सर्वजण सुरक्षित आहोत. याची जाण प्रत्येक भारतीयांनी ठेवली पाहिजे. तरुणांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून दुखवटा न पाळता गावागावात, तरुण मंडळांसह घराघरात दुखवटा पाळला पाहिजे. शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान ऋषिकेश जोंधळे, बहिरेवाडी यांना विरत्व प्राप्त झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यमगर्णी येथे ग्रामस्थांच्यावतीने श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी बसस्थानकापासून ग्रामपंचायतीपर्यंत प्राणलिंग स्वामी, बसवेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. जी. कुंभार यांच्यासह ग्रामस्थांनी मेणबत्ती प्रज्वलित करून फेरी काढली. शहीद जोंधळे यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष नासिर खान इनामदार, विजय यादव, प्रा. विजय कुंभार, आण्णासो कोरे, नंदकुमार चौगुले, अरुण पोवार, रिझवान सय्यद, रंगनाथ कुंभार, राजू सुतार, सलीम मुल्ला, प्रभाकर कुंभार, महादेव जत्राटे, महादेव बाडकर, अजित मोरे, गणेश डोळे, मयूर कातुरे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर श्रीखंडे यांनी केले.