तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात सोमवारी 472 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 284 पुरुष, 188 स्त्रियांचा समावेश आहे. आज 15 तर आतापर्यंत 472 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 21 हजार 356 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 867 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2094 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1622 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 472 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 21 हजार 356 रुग्णांपैकी 13 हजार 163 पुरुष, 8 हजार 193 स्त्री आहेत. आतापर्यंत 472 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 13 हजार 902 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट – 835 मंगळवेढा- 1004, बार्शी – 4014 माढा- 2159, माळशिरस – 3246 मोहोळ- 931, उत्तर सोलापूर – 648 करमाळा- 1613, सांगोला – 1431 पंढरपूर 4279, दक्षिण सोलापूर – 1196
एकूण – 21, 356
होम क्वांरटाईन – 5329
एकूण तपासणी व्यक्ती- 161714
प्राप्त अहवाल- 161623
प्रलंबित अहवाल- 91
एकूण निगेटिव्ह – 140267
कोरोनाबाधितांची संख्या- 21, 356
रुग्णालयात दाखल – 6867
आतापर्यंत बरे – 13902
मृत – 587
सोलापूर शहरात ५१ नवे रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू
मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहितीबरे झाल्याने 33 रुग्णांना सोडले घरी
सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 33 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापूर शहरात सोमवारी 309 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 258 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 51 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 33 पुरुष तर 18 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7953 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 75799
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7953
प्राप्त तपासणी अहवाल : 75799
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 67846
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 460
उपचारात असलेले : 933
बरे झालेले : 6560