उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची नियुक्ती
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्हा परिषदेतील प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांची उस्मानाबादला बदली झाली असून त्यांच्या जागी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील 9 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पटेल यांची राऊत यांच्या रिक्त जागी नियुक्ती झाली आहे तर पाटील यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेतील जल जीवन मिशनच्या संचालक इशाधीन शेळकंदे यांची नियुक्ती झाली आहे.