प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर-दक्षिण सोलापुरातील बोरामणी परिसरातील दावल मलिक भागातील तलावात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी 5.45 च्या सुमारास घडली.
मोहम्मद हारुण सलीम शेख (वय 41), यासीन हारुण शेख (वय 35), रिदाना तौफिक शेख (वय 35, रा. विडी घरकुल, कुंभारी ) असे मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत. शेख आणि इतर कुंटंgबातील काहि लोक शनिवारी दुपारी बोरामणी परिसरातील दावलमलिक देवस्थान परिसरात गेले होते. त्यांनी तेथे जेवण केले. त्यानंतर त्यांच्यापैकी काहीजण परिसरातील तलावात हातपाय धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. पैकी एकजण पाण्यात पाण्यात बुडत असताना, त्याला वाचविण्यासाठी इतरही पाण्यात उतरले. त्यावेळी तिघेही पाण्यात बुडाले. तर काहीजण पाण्यातून बाहेर पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. कौटुंबिक सहलीकरीता म्हणून हे लोक तेथे गेले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
परिसरातील नागरिक आणि बोरामणी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे व हवालदार गायकवाड यांनी पाण्यातून तिघांना काढून उपचाराकरीता शासकीय रुiणालयात दाखल केले.