चिकोडी : हिरेकोडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घरकुल मंजुरीसाठी जीपीएस केले आहे. पण याला तीन वर्षे लोटली तरी अद्याप मंजुरीपत्रांचे वितरण केलेले नसून तातडीने मंजुरीपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी विक्रम बनगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली. तालुका पंचायतीत रोहयो योजनेचे अधिकारी शिवानंद शिरगावी यांना निवेदन देण्यात आले. जीपीएस केलेल्या 999 लाभार्थींना तातडीने मंजुरीपत्रे द्यावीत. आदेश न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अनिता बनगे, सुनिल गावडे, लक्ष्मण मोहिते, अजित करगावे, रामचंद्र गाणगेर, श्रीकांत आक्कन्नवर, अक्षय मेक्कळकी, मारुती बरगाले आदी उपस्थित होते.
Related Posts
Add A Comment