बेंगळूर/प्रतिनिधी
२९ मार्चपासून म्हैसूर आणि चेन्नई दरम्यान एक नवीन विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. याबाबत पुष्टी देताना म्हैसूर-कोडगूचे खासदार प्रताप सिंह यांनी इंडिगोने सुरू केलेली विमानसेवा २९ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. आठवड्यातून तीन वेळा हे विमान उड्डाण करेल.
इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान सायंकाळी ४.४५ वाजता म्हैसूरहून सुटेल. ते चेन्नईला सायंकाळी ५.५५ वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने हे विमान दुपारी अडीच वाजता चेन्नईहून सुटेल आणि सायंकाळी ४.१५ वाजता म्हैसूरमध्ये उतरेल असे म्हंटले आहे.