प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीमधील अंजली अजित साळवी यांची भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आह़े साळवी यांनी यापूर्वी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस काम केले आह़े आपल्या पदाचा वापर करून साळवी यांनी महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लावल़े तसेच महिला बचत गटांची स्थापना करून त्याना मार्केटिंग उपलब्ध करून दिल़े अंजली साळवी यांच्या नियुक्ती बद्दल महिला वर्गाकडून व रत्नागिरीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आह़े