ऑनलाईन टीम / नैरोबी :
भारतीय ऍथलीट अमित खत्रीने शनिवारी नैरोबी येथे झालेल्या 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. अमितने 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले आहे. अमितने 42 मिनिट 17.94 सेकंदांसह ही शर्यत पूर्ण केली. तर केनियाच्या हेरिस्टोन व्हॅनीयोनीने 42 मिनिट 17.84 वेळेसह सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेंतील भारताचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी भारताने 4 बाय 400 मिश्र रिलेमध्ये भारताने कास्य पदकाची कमाई केली आहे.
अमित खत्रीने हे अंतर 42 मिनिटे 17.49 सेकंदात पूर्ण केले. या स्पर्धेचे सुवर्णपदक केनियाच्या हेरिस्टोन व्हॅनियोनीकडे गेले, ज्यांनी निर्धारित अंतर 42 मिनिटे 10. 84 सेकंदात पूर्ण केले. तर स्पेनच्या पॉल मॅकग्राने 42 : 26.11 मध्ये अंतर कापून कांस्य पदक जिंकले.
17 वर्षीय अमितसाठी हे वर्ष खूप चांगले गेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याने 10 किमी धावताना अंडर -20 मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. या दरम्यान, त्याने 18 व्या राष्ट्रीय फेडरेशन कपमध्ये 40.97 सेकंदांच्या वेळेत पूर्ण करत पदक जिंकले.
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने अमितचे अभिनंदन केले आहे. भारताने एकाच चॅम्पयिनशिपमध्ये फूट रेसमध्ये दोन पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. अभिनंदन चॅम्पयिन असे म्हटले आहे.