आयसीईआरच्या अधिकाऱयाचा चकीत करणारा दावा
जगभरात अनेक ठिकाणी एलियन्स (परग्रहवासीय) आणि त्यांचे यान पाहिल्याचा दावा केला जात असतो, पण आता या दाव्यांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱयांकडून युएफओ आणि एलियन्ससंबंधी सादर करण्यात आलेला समीक्षा अहवाल उघड झाला आहे. या अहवालात मागील 20 वर्षांमध्य अमेरिकेच्या नौदलाकडून आकाशात पाहिले गेलेल्या अज्ञात वस्तूंच्या 120 हून अधिक घटनांचा उल्लेख आहे.
जर एलियनचे यान येत असल्यास ते गायब कुठे होते यावर चर्चा रंगू लागल आहे. पण याचदरम्यान इंटरनॅशनल कोएलिशन फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रियल रिसर्चचे (आयसीईआर) उपाध्यक्ष गॅरी हेसेल्टाईन यांनी एलियन्स अंतराळातून नव्हे तर समुद्रातून येत असल्याचा दावा केला आहे.
युद्धनौकांच्या आसपास युएफओच्या अलिकडच्या चित्रफिती त्यांच्या उत्पत्तिची व्याख्या करण्यास गेमचेंजर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेची युद्धनौका उडणाऱया ऑब्जेक्ट्सनी घेरलेली चित्रफित पाहून संशोधकांना एलियन्सचे वास्तव्य पाण्याखाली असल्याचे वाटू लागले आहे.
युएफओ पाण्याच्या आत आणि बाहेर दिसून येतात. याचमुळे आमच्या खोल महासागरांमध्ये आणि दऱयांमध्ये एलियन्सचा तळ असू शकतो. आम्ही केवळ 5 टक्केच महासागराबद्दल जाणून आहोत असे उद्गार माजी पोलीस अधिकाऱयाने काढले आहेत.
आम्ही महासागरांपेक्षा चंद्र किंवा मंगळाच्या पृष्ठभागावर अधिक जाणतो. याचमुळे युएफओ अनेकदा पाण्याच्या आतच ये-जा करत असावेत असे त्यांनी म्हटले आहे. गॅरी हेसेल्टाईन यांनी रॉयल एअर फोर्स पोलिसांसोबत काम केले आहे. हेसेल्टाईन यांनी 2002 मध्ये युएफओ पाहण्यासाठी एक राष्ट्रीय डाटाबेस सादर केला होता. 2013 मध्ये पोलीस दलातून निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या संशोधनावर लक्ष केंद्रीत केले होते.
अमेरिकेच्या नौदल आणि वायुदलाच्या सैनिकांकडून चित्रित करण्यात आलेल्या चित्रफिती समोर आल्यावर अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱयांना काँग्रेससाठी युएफओवर एक डोजियर संकलित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा अहवाल चालू महिन्यात प्रकाशित होणार आहे.