अनुराधा कदम/प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सव हा जसा शक्तीचा, तेजाचा उत्सव तसाच तो देवीच्या महात्म्यातील अनेक रूपांच्या आराधनेचाही उत्सव आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या दक्षिण काशी कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे स्थान असल्याने गेल्या साडेतीनशे वर्षाहून अधिक काळापासून शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवस अंबाबाईच्या विविध रूपांतील पूजेचा थाट पाहणे हा भाविकांसाठी एक सोहळाच असतो. अध्यात्मातील काही संदर्भ, दंतकथा, संकल्पना यांचा आधार घेऊन एखाद्या कथेतील प्रसंगानुरूप अंबाबाई दरवर्षी गाभाऱयात नवरूपांमध्ये अवतरते. नवरात्रात बांधल्या जाणाऱया या नऊ रूपांतील पूजेच्या महिनाभराच्या तयारीअंती प्रत्यक्ष नवरात्रकाळात नवरात्राची नव रूपे तू… घेऊनिया येसी या उक्तीची प्रचिती भाविकांना येते.
अंबाबाईची मूळ नऊ रूपे आहे. ज्यामध्ये शैलपुत्री, ब्रम्हचारीणी, चन्द्रघन्टा, कुष्पांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिध्दीदात्री या रूपांचा समावेश आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांच्या काळात अंबाबाई तेजतत्वाच्या आधारे आपल्या नऊ शस्त्रांसह ब्रम्हांडात विहार करत असते असा समज आहे. आदिशक्तीचे दरदिवशी नवरात्रात नव्या रूपासह भ्रमण करणे म्हणजे चढत्या क्रमाने सप्तपाताळापासून पृथ्वीवर येणाऱया त्रासदायक लहरींचे उच्चाटन करणे अशी धारणा आहे. यामुळेच अंबाबाईची नवरूपांमध्ये पूजा बांधण्याबरोबरच त्या पूजेचे धार्मिक महत्व, अधात्म्यातील स्थान याचीही माहिती भाविकांना दिली जाते. नवरात्रातील पहिल्या दिवशी बैठी, ललिता पंचमीला गजारूढ, अष्टमीला महिषासूरमर्दिनी आणि दसऱ्याला अश्वारूढ पूजा ही रूपे कायमस्वरूपी ठरलेली असतात, याव्यतिरिक्त इतर दिवशी रूपातील पूजा बांधली जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवशी अंबाबाईच्या धार्मिक विधींना पहाटेपासूनच सुरूवात होते. अभिषेक व आरती झाल्यानंतर देवीला मानाचा नैवेदÎ दाखवला जातो. दुपारी बाराची आरती आणि विधी झाले की अंबाबाईची नवरात्रकाळातील सालंकृत पूजा बांधण्याचे काम सुरू होते. अंबाबाईच्या पूजेचा वार ज्या श्रीपूजकांकडे आहे ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पूजा बांधायला सुरूवात करतात. तब्बल दोन ते अडीच तासांच्या मेहनतीनंतर अंबाबाईचे पूजारूप भाविकांना पहायला मिळते. दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर अंबाबाईची नवरूपे ठरवून दरदिवशी पूजा बांधली जाते. पूजेनुसार अंबाबाईला परिधान करण्याच्या साडीचा रंग, ठरवलेल्या रूपानुसार देवीचे जडावी अलंकारांची निवड, पूजेच्या प्रसंगात येणारे देवदेवता, प्राणी, सभोवतालीचा देखावा याचीही मांडणी केली जाते. यासाठी पूरक साहित्य मागवले जाते. खरंतर अंबाबाईची मूर्ती उभ्या रूपात आहे , मात्र नवरूपांमध्ये कधी मूर्ती बैठी दर्शवली जाते. कालीमातेच्या रूपात अष्टभुजा दाखवल्या जातात. लक्ष्मीच्या रूपात कमळातील आसन बनवले जाते. अशा अनेक रूपांमधून अंबाबाईचे रूप अधिक प्रसन्न करण्यात येते.
गेल्या दीडशे वर्षाहून अधिक काळ नवरात्रात देवीच्या विविध रूपातील पूजा बांधण्याची परंपरा आहे. यासाठी देवीच्या आख्यायिकांच्या संदर्भाचा अभ्यास करावा लागतो. पूजेच्या रूपाविषयीची योग्य माहितीही सांगावी लागते. नवरात्रकाळातील अंबाबाईच्या नवरूपातील पूजा भाविकांना आनंद देतात. मयूर मुनिश्वर, श्रीपूजक