दिनांक 25-12-2022 ते 31.12.2022
मेष
आठवडय़ाची सुरुवात अत्याधिक व्यस्ततेने आणि काहीशा बेचैनीने होण्याची शक्मयता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवले तर बऱयाच गोष्टी सोप्या होतील. व्यापारी वर्गाला बऱयाच संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने वरिष्ठांचा मर्जीने काम करावे. तब्येतीच्या बाबतीत बेपर्वा राहू नका. संततीकडून शुभ समाचार प्राप्त होईल. जे सिंगल आहेत त्यांना नवीन नात्याबद्दल आशा करायला हरकत नाही.
तेल दान द्यावे
वृषभ
जुनी येणी वसूल झाल्यामुळे किंवा आर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे आनंदी असाल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांसोबत पिकनिक प्लॅन करू शकता. कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे सहकार्य प्राप्त झाल्याने बरीचशी कामे पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. या आठवडय़ात रिस्क असलेले कुठलेही काम हाती घेऊ नका, नुकसान होण्याची शक्मयता आहे. प्रेमसंबंध दृढ होतील.
हळदीचा टिळा लावावा
मिथुन
आठवडा दगदगीचा असणार आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवावी. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. अनोळखी माणसांमुळे अडचणीत सापडण्याची शक्मयता आहे. भावा-बहिणीमध्ये छोटय़ाशा कारणावरून भांडणाची वेळ येऊ शकते. वैवाहिक आयुष्यात चढउतार राहील. विद्यार्थ्यांनी कसून मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
मुक्मया प्राण्यांची सेवा करावी
कर्क
उत्तम फलदायी असा आठवडा असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. जुने रोग किंवा जुनी दुखणी बरी होतील. मानसिक ताकद वाढल्याने अनेक निर्णय योग्य पद्धतीने घ्याल. पैतृक संपत्तीचा लाभ होण्याची शक्मयता आहे. घरात सुख समृद्धी येईल. नात्यांमध्ये गोडवा कायम असेल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये थोडी कटुता येण्याची शक्यता आहे.
सात प्रकारची धान्ये दान द्यावीत
सिंह
मध्यम फलदायी असा आठवडा असणार आहे. बरीच कामे पूर्ण होतील पण अपेक्षित रिझल्ट मिळतीलच असे नाही. आर्थिक दृष्टीने सुद्धा आठवडा सर्वसाधारण असेल. पुढे येणाऱया चांगल्या काळासाठी तयारी आत्ताच केलेली बरी. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. तब्येतीच्या दृष्टीने काळजी करावी असे काही नाही. वैवाहिक जोडीदाराबरोबर बोलत असताना शब्दांचा योग्य वापर करावा.
धार्मिक स्थळी अत्तराचे दान द्यावे
कन्या
आठवडय़ाचे फळ उत्तम आहे. मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण उपभोगाल. नवीन कपडे किंवा दागिन्यांची खरेदी कराल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱया न करता अनेक एक संधी प्राप्त होते. धर्माने अध्यात्माकडे गुरुजी वाढेल. एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा विचार कराल. मंगल कार्यात भाग घेऊ शकतात. वैवाहिक जीवनातील पदुका दूर होईल.
दिव्यांग व्यक्तीला विनयपूर्वक अन्नदान करा
तूळ
सगळय़ा दृष्टीने हा आठवडा उत्तम असेल. घरी पाहुण्यांचे आणि मित्रांचे आवागमन जास्त असेल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा आठवडा चांगला आहे. जुने एखादे दुखणे बरे होईल. वैवाहिक जीवनात सर्वसामान्य घटना घडतील. विद्यार्थ्यांनी देखील चांगली मेहेनत घेतली तर सुयश प्राप्त होईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा मध्यम फलदायी असेल. प्रेमसंबंधात मधुरता येईल.
अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे
वृश्चिक
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी असा असेल. अपेक्षा नसताना काही कामे पूर्ण होतील तर जी कामे नक्की होणार असे वाटते. त्यामध्ये अडथळे येतील. शारीरिक व्याधी दूर होण्याच्या मार्गावर असतील. मानसिक समाधान प्राप्त होईल. नोकरदारवर्गाला कामामध्ये थोडय़ा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यापारी वर्गाला मध्यम स्वरूपाचा काळ आहे. प्रेम संबंधांमध्ये मात्र कटूता येण्याची शक्मयता आहे.
गरजूला वस्त्र दान करा
धनु
हा आठवडा या आठवडय़ामध्ये तुम्ही मंगल कार्यात गुंतलेले असणार. मन प्रसन्न असेल. टेक्नॉलॉजीशी निगडीत असलेल्या लोकांना अनेक संधी प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला मानसन्मानाची प्राप्ती होईल. कुटुंबासोबत छोटय़ा पिकनिकला जाऊ शकता. कामानिमित्त केलेल्या प्रवासामध्ये फायदा होईल. वैवाहिक जीवनातला आनंद कायम राखण्यासाठी तडजोड करावी लागेल.
तुळशीची पाच पाने जवळ ठेवावी
मकर
मध्यम फलदायी असा आठवडा असणार आहे. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापासून दूर रहा. विशेषतः रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. काही कामे न झाल्याने चिडचिड होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहण्याची गरज आहे नाहीतर नुकसान होऊ शकते. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. दांपत्यजीवन चांगले असेल. एन्जॉयमेंटकरता यात्रा कराल.
पक्षांना दाणे घाला
कुंभ
आत्मविश्वासात वाढ झाल्याने निर्णय घेण्यामध्ये अचूकता येईल आणि त्यामुळे बरीचशी कामे होतील. ज्यांना थोडेफार अपयश येईल असे वाटते त्यांना हार न मानण्याची आणि प्रयत्न करण्याची गरज आहे. पारिवारिक सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. आर्थिक यश प्राप्त करण्याकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. नोकरदार वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नवीन कामे किंवा प्रोजेक्ट सुरू करण्याकरता योग्य वेळ आहे.
चंदनाचा टिळा लावावा
मीन
शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्टीने हा आठवडा उत्तम असेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याकरता किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता अनुकूल काळ आहे. मनोरंजनाच्या उद्देशाने यात्रा करू शकाल. कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे सहकार्य प्राप्त होईल. संततीकडून शुभ समाचार प्राप्त होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला अडलेली कामे पूर्ण होत आहेत, असा अनुभव येईल. घरी धार्मिक कार्य घडू शकते.
मोहरीच्या तेलाचे दान द्यावे.
टॅरो उपायः
राजनीति, अध्यापन किंवा ज्या लोकांचा संबंध पब्लिकशी म्हणजे लोकसमूहाशी येतो त्यांच्यासाठी हा उपाय आहे. आपल्यातले आकर्षण वाढावे म्हणून झेंडूच्या फुलांच्या पाकळय़ा गंगाजला बरोबर सहाणेवर उगाळून घ्याव्या आणि त्याचा टिळा लावावा.