प्रयागराज येथे सप अध्यक्षांचा प्रचार
सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी प्रयागराज येथील करछनामध्ये जाहीर सभा घेतली आहे. यादरम्यान व्यासपीठावर अखिलेश यांच्याशी हस्तांदोलन करण्यावरून चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आहे. कार्यकर्ते एकमेकांवर पडल्याचे चित्र दिसून आले. तर सभेला संबोधित करताना अखिलेश यांनी जनतेचे समर्थन समाजवादी पक्षाला मिळत असल्याचा दावा केला.
पोलिसांची 100 क्रमांकाचे वाहन भाजप सरकारने उत्तरप्रदेशात 112 क्रमांकाची करून भंगारजमा केली आहे. सप सरकार आल्यास 100 क्रमांकाच्या वाहनांची संख्या दुप्पट करू. आम्ही आदिवासी समुदायाच्या विकासासाठी काम करणार आहोत. शासकीय विभागांमध्ये 11 लाख पदे रिक्त असून ती त्वरित भरण्यात येतील असे अखिलेश म्हणाले.
भाजप सरकारमध्ये 69,000 शिक्षकांच्या भरतीत घोटाळा झाला असून याप्रकरणी अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देऊ. महिला शिक्षकांना त्यांच्या जिल्हय़ात नियुक्ती देणार आहोत. महिलांना शासकीय नोकऱयांमध्ये 33 टक्के आरक्षण सप सरकार देणार आहे. आदिवासी लोकांना सामाजिक आणि आर्थिक लाभ दिले जातील. या समुदायाला समाजवादी पेन्शनशी जोडले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.