‘एनसीबी’ची कारवाई : अमली पदार्थाबाबत गुन्हय़ांची दिली कबुली
प्रतिनिधी/ मुंबई
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय, ईडी आणि एनसीबीकडून कसून तपास सुरू असतानाच, पेंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी
सुशांतसिंहची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला बेडय़ा ठोकल्या. तिसऱयांदा चौकशी केल्यानंतर एनसीबीने अखेर ही कारवाई केली. आज, बुधवारी रियाला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.
सोमवारी केलेल्या चौकशीत रियाने अमली पदार्थ स्वत: घेणं, विकत घेणं, हातात घेणं याबाबत स्पष्ट नकार दिला होता. एनसीबीलाही रियाला अटक करण्यापूर्वी पुरावे जमा करायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा मंगळवारी रियाला चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीसाठी रिया एनसीबीच्या कार्यालयात सकाळी 10 च्या सुमारास हजर राहिली. त्यावेळी तिने अमली पदार्थाविषयी गुन्हय़ांची कबुली दिली.
अमली पदार्थाच्या सेवनावरून रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांच्या अटकेनंतर रियाभोवती चौकशीचा फास एनसीबीने आवळला होता. शौविकला ती ड्रग्जसंदर्भात सूचना करीत होती. त्यानुसार, शौविक अब्दुल आणि जैदच्या संपर्कातून अमली पदार्थ मिळविल्यानंतर ते सॅम्युअल मिरांडाकडे देत असे. त्यानंतर रियाच्या सांगण्यावरुन दीपेश ते ड्रग्ज घेऊन येत असल्याची कबुली रियाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, एनसीबीच्या चौकशीच्या दुसऱया दिवशी केलेल्या चौकशीत रियाने बॉलिवूडमधील 18 ते 19 बडय़ा लोकांची नावे घेतली आहेत. त्यामुळे आता बॉलिवूड सेलिब्रिटींवरही चौकशीची टांगती तलवार लटकत आहे.
सुशांतची बहीण, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनंतर सुशांतची बहीण प्रियंका व दिल्लीतील कार्डीओलॉजिस्ट डॉ. तरुण कुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पेंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केले आहे. सुशांतवर मानसोपचार उपचार सुरू असल्याचे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी रियाने ही तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सुशांतच्या व्हिसेराची पुन्हा तपासणी होणार
सुशांतसिंहच्या मफत्यू प्रकरणात सीबीआयचे पथक एम्सच्या डॉक्टरांची मदत घेत आहे. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट पुन्हा एकदा तपासला जाणार आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना त्यांनी सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात केले. शवविच्छेदन करणाऱया पाच डॉक्टरांनी केलेल्या आरोपामुळे मुंबई पोलीस अडचणीत आले आहेत. डॉक्टरांच्या आरोपानुसार पोलिसांनीच रात्री उशिरा आणि लवकरात लवकर शवविच्छेदन करण्यास सांगितल्याचा खुलासा केला आहे. व्हिसेरा कलीना येथील न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठवण्यात आला होता. त्यातील 80 टक्के नमुने मुंबई पोलिसांनी तपासासाठी वापरले असल्याचे न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे 20 टक्के नमुन्याच्या आधारे सीबीआयला तपास करावा लागणार आहे.