प्रतिनिधी/ बेळगाव
दुसऱया रेल्वे फाटकावरील गेट सातत्याने नादुरूस्त होऊन कोसळत असल्याने धोका निर्माण झाला आहे. वारंवार घडणाऱया या घटनेमुळे रेल्वे खात्याचे कर्मचारी देखील वैतागले आहेत. त्यामुळे येथील गेटच्या पाईप बदलण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. दिवसभर गेटच्या दुरूस्तीचे काम सुरू होते.
शहरातील विविध रेल्वे फाटकावरील फाटक हटवून उड्डाणपुल उभारण्याचे काम करण्यात येत आहे. पहिल्या आणि दुसऱया रेल्वेफाटकावर देखील उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र हे काम हाती घेण्यापूर्वीच दुसऱया रेल्वे फाटकावरील गेटचे फाटक वारंवार नादुरूस्त होत आहे. गेट उघडताना यापूर्वी दोनवेळा कोसळून पडले होते. प्रयत्न केल्यानंतर दुरूस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आले. पण काही कालावधी जाताच दोन दिवसापूर्वी दिवाळी सणाच्या दरम्यानच हे गेट पुन्हा कोसळून पडले आहे. फाटकाच्या पाईप जुन्या झाल्याने नादुरूस्त होऊन कोसळण्याचा प्रकार घडत आहे. प्रत्येक वेळी दुरूस्ती करून फाटक चालू बंद करण्यात येते. सध्या रेल्वे प्रवासी वाहतुक कमी असली तरी मालवाहतुक सुरू आहे. त्यामुळे 24 तासात 15 ते 20 वेळा फाटक बंद करावे लागते. फाटक सुरू बंद केल्यामुळे ताण पडून नादुरूस्त होत आहे.
फाटक उघडताना किंवा बंद करताना कोसळून पडत असल्याने या ठिकाणी ये-जा करणाऱया वाहनधारकांना देखील धोकादायक बनले आहे. आतापर्यंत अनेकवेळा फाटक कोसळून पडले. पण कुणाला ईजा झाली नाही. मात्र धोका कायम आहे. वारंवार दुरूस्ती करून रेल्वे खात्याचे कर्मचारी कंटाळले आहेत. त्यामुळे सदर फाटकाची पाईप बदलण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. दुसरी पाईप बसवून फाटकाची दुरूस्ती करण्यात आली. हे काम दिवसभर सुरू होते.