मुख्याधिकारी दखल घेणार काय? जागा ढापण्याचा प्रकार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात काही अवलिया व्यक्ती आहेत. त्या काय कुठे कधी करतील याचा नियम नाही. अशाच सातारा पालिकेच्या हद्दीत गोडोली भागात सातारी जुगाड काय असते त्याचा प्रत्यय सातारकांना येवू लागला आहे. रस्त्याच्या बाजूने जिन्हा काढला आहे. परंतु पुढे इमारतीत जायला आतमध्ये जागाच नाही. जागा ढापण्याचा प्रकार असून मुख्याधिकारी दखल घेणार काय?, नेमका प्रकार काय याची माहिती मुख्याधिकाऱयांनी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
सातारा शहरातील गोडोली भागात एका नगरसेवकाच्या कृपेने नगरपालिकेच्या जागेत इमारत उभी करण्यात आली आहे. त्या इमारतीत भाडय़ाने एका हॉस्पिटलला जागा दिलेली आहे. त्या हॉस्पिटलला जाण्या-येण्याचा रस्ता हा अन्य मार्गाने आहे. परंतु याच हॉस्पिटलने चक्क जिना काढला तो दुसऱया मजल्याच्या ग्राऊंडवरुन. त्यामुळे जागा ढापण्याचा हा प्रकार असून या साताऱयाच्या जुगाडाकडे लक्ष आहे का?, मुख्याधिकारी नेमकी काय कार्यवाही करणार अशी मागणी जोर धरु लागली आहे.