वार्ताहर / लोणंद :
लोणंद-शिरवळ रोडवर अंदोरी ता. खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या सहारा ढाब्यासमोर शुक्रवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन बिरा उर्फ सुरेश संपत बरकडे (वय 44, रा. हरळी, सध्या रा कराडवाडी ता. खंडाळा) याचा अपघाती मृत्यु झाला. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमधे करण्यात आली आहे.
या घटनेबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली आधिक माहिती अशी, अंदोरी ता. खंडाळा गावच्या हद्दीत लोणंद -शिरवळ रोडवर असणाऱ्या सहारा ढाब्यासमोर शुक्रवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन बिरा उर्फ सुरेश बरकडे यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात बरकडे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास सपोनि विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे करत आहेत.