सावंतवाडी/प्रतिनिधी-
अटल प्रतिष्ठान सावंतवाडीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या खुल्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर केला आहे. या स्पर्धेत सावंतवाडी आरपीडी हायस्कूलची विद्यार्थिनी अस्मी प्रवीण मांजरे करने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई-माहिमच्या सौ. प्रगती रानडे यांनी द्वितीय तर मातोंड येथील साहिशा विठ्ठल केळजी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पर्वरी गोवा येथील समिहन मंगेश काळे याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
खुल्या गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा या भागातtन 32 स्पर्धकांनी भाग घेतला होता. बी पॉझिटिव्ह’ अर्थातकोरोना काळात मला आलेला सुखद अनुभव’. हा विषय स्पर्धेसाठी होता. स्पर्धकांनी कोविड काळातील नकारात्मकता दूर करण्यासाठी व मानसिक स्थैर्य जपण्याच्या अनुषंगाने या विषयाची प्रभाविपणे मांडणी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपले मानसिक आणि शारीरिक संतुलन ढळू न देता सकारात्मक विचार केल्यास आनंदाने जीवन जगणे सहज शक्य आहे. अशा शब्दांत या स्पर्धकांनी आपले अनुभव कथन केले. हि राज्यस्तरीय खुली स्पधा असूनहि यामध्ये आरपीडी हायस्कूलच्या पाचवीतील विद्यार्थिनी अस्मी मांजरेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक होत आहे.
सर्व यशस्वी स्पर्धकांचे अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड. नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी अभिनंदन केले असून अटल प्रतिष्ठानच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे आभार मानले आहेत. यशस्वी स्पर्धकांना लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे.