लागवड पाहण्यासाठी नागरिकांची होत आहे गर्दी : परिसरात पहिलाच प्रयोग होत असल्याने औत्सुक्य
प्रतिनिधी / बेळगाव
वेगवेगळय़ा हंगामामध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. मात्र अलिकडच्या काही वर्षात उन्हाळय़ात देखील भातरोप लागवडीकडे शेतकऱयांचा कल वाढलेला दिसत आहे. उन्हाळय़ात भातरोप लागवडीचे प्रयोग करून भरघोस उत्पादन शेतकरी मिळवत आहेत. अशाप्रकारे अतिवाड येथील लक्ष्मण सातेरी पाटील या शेतकऱयांने नुकतीच दीड एकर क्षेत्रात उन्हाळी भातरोप लागवड केली आहे. परिसरात व गावात हा प्रयोग प्रथमच असल्याने ही रोप लागवड पाहण्यासाठी शिवारात शेतकऱयांची गर्दी होत आहे.
खरीप हंगामात भात पेरणी व भात लागवड अधिक प्रमाणात केली जाते. मृग नक्षत्राच्या दरम्यान भात पेरणी केली जाते. व पावसाळय़ात भातरोप लागवड केली जाते. मात्र अतिवाड येथील शेतकऱयाने चक्क उन्हाळय़ात भातरोप लागवड केली आहे.
रोपलागवड विहिरीच्या पाण्यावर
याकरिता त्यांनी पावसाळय़ाप्रमाणे चिखल करणे, रोप काढणे अशी कामे करून घेतली व शेतकरी मजूरांच्या मदतीने रोप लावगड केली आहे. रोप लागवड केल्याने उत्पादनात वाढ होऊन भांगलणीचे काम देखील कमी होते. ही सर्व रोपलागवड विहिरीच्या पाण्यावर करण्यात आली आहे.
… तर शेतकऱयांची संख्या वाढेल
उन्हाळय़ात भातरोप लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास येत्या काळात उन्हाळय़ात भातरोप लागवड करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढेल, या भातरोप लागवडीकडे परिसरातील शेतकऱयांचे लक्ष लागले असून उत्पादन चांगले मिळाल्यास हा प्रयोग इतर शेतकऱयांना आदर्श ठरणारा आहे.