कर्नाटक प्रदेश कुरुबर संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
धारवाड जिल्हय़ातील कुंदगोळ तालुक्मयामध्ये मेंढरे चरण्यासाठी नेलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना अत्यंत गंभीर आहे. व्हन्नूर, ता. बैलहोंगल येथील ही महिला पोटासाठी धारवाड जिल्हय़ामध्ये गेली असता ही घटना घडली आहे. यामध्ये जे आरोपी आहेत, त्यांचा शोध लावून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा कुरुबर संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
धनगर समाज हा मेंढरे पाळण्याचे काम करतो. त्यांना दिवसरात्र शिवारामध्ये रहावे लागते. कुंदगोळ गावामध्ये महिला एकटीच असताना तिच्यावर काही जणांनी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा खून करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे गरजेचे आहे. तातडीने आरोपींचा शोध लावावा आणि त्या महिलेच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आरोपींचा शोध घेणे महत्त्वाचे असून जर त्यामध्ये उशीर केला तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मड्डय़ाप्पा तोळीन्नावर, लक्ष्मण चिंगळे, विनायक बनहट्टी, बसवराज बपळेगुंदी, शंकर हेग्गी, अशोक सदलगी यांच्यासह धनगर संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.