प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ ते उद्यमबाग पर्यंतच्या संपर्क रस्त्याशेजारी सायकल ट्रक निर्माण करण्यात येत आहे. परिणामी रस्ता अरूंद होत असल्याने याला स्थानिक व्यवसायिकांनी विरोध केला आहे. याची दखल घेऊन अखेर स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी सोमवारी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. तसेच सायकल टॅक निर्माण करण्याबाबत पर्यायी उपाययोजना राबविण्याचा विचार स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी चालविला आहे.
अनगोळ ते उद्यमबाग पर्यंतच्या संपर्क रस्त्याचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकास कामे राबविताना कोणतेच नियोजन केले जात नाही. कोणतेही नियोजन नसल्याने याचा फटका शहरवासीय आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे. रस्त्याचा विकास करताना स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि त्यांना हव्या असलेल्या सुविधांचा विचार करणे गरजेचे आहे. पण याबाबत नागरिकांकडून कोणत्याच सूचना न घेता विकास कामे राबविण्याचा सपाटा स्मार्ट सिटी कंपनीने चालविला आहे. त्यामुळे रस्ते अरूंद होण्याबरोबरच स्थानिक व्यवसायिकांना अडचणी निर्माण होत आहेत. उद्यमबाग ते अनगोळ पर्यंतच्या संपर्क रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुल होण्याची शक्मयता आहे. पण रस्ता करताना याचा विचार स्मार्ट सिटी कंपनीने केला नाही. त्यामुळे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी निवेदन देऊन रस्त्याचा विकास नियोजनबद्ध करावा अशी मागणी केली होती.
तसेच रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ व सायकल ट्रक निर्माण करण्यात येत आहे. पण याकरिता दोन्ही बाजुने 30 फूट रस्त्याची जागा जात आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी कमी झाली आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतुक होत असते. त्यामुळे सायकल ट्रक निर्माण करण्यास स्थानिक व्यवसायिकांनी व उद्योजकांनी विरोध केला आहे. याबाबत लघु उद्योग संघटनेकडे तक्रार केली होती. तसेच स्मार्ट सिटी कंपनीकडे याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची पाहणी स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक शशिधर कुरेर यांनी सोमवारी केली. याठिकाणी निर्माण होणारी समस्या जाणून घेतली. दुतर्फा सायकल ट्रक करीता भरपूर जागा लागणार असल्याने सायकल ट्रकबाबत पर्यायी प्रस्ताव राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच याकरिता प्रस्ताव तयार करण्याची सूचना अभियंत्यांना केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.