शाहीर प्रदीप सुतार यांची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
मारुती गल्ली, अनगोळ येथील मारुती मंदिराच्या नवीन रथाचे आगमन शुक्रवार दि. 8 रोजी होणार आहे. यानिमित्त शनिवार दि. 9 रोजी सायंकाळी 5 वाजता निपाणी येथील शाहीर प्रदीप सुतार यांच्या पोवाडा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
गणेश वंदना, शौर्यगीत, स्फूर्तिगीत, महाराष्ट्र गीत, शेतकरी गीत, व्यसनमुक्ती, शिवचरित्र आणि समाज प्रबोधन असा हा कार्यक्रम होणार आहे. प्रदीप सुतार यांनी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात पोवाडय़ांचे अनेक कार्यक्रम केले आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मारुती मंदिराकडून करण्यात आले आहे.