प्रतिनिधी/ बेळगाव
आरोग्य खाते व औषध नियंत्रण विभागाने रामदुर्ग येथील एका अनधिकृत क्लिनिक आणि लॅबोरेटरीला टाळे ठोकले. सदर क्लिनिक व लॅबोरेटरी अनधिकृत असून चालकाने त्याबाबत अधिकाऱयांना कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण दिले नाही. शिवाय या दोन्हींचा अधिकृत नोंदणी परवानाही नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
केपीएमईए नोडल अधिकारी डॉ. एम. व्ही. किवडसण्णावर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. एम. बी. तडहाळ तसेच आरोग्य निरीक्षकांनी ही कारवाई करून चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली.