प्रतिनिधी / बेळगाव
पूर्वी समादेवी गल्ली व सध्या बसवाण गल्ली येथे राहणारे अनिल गोपाळ भांडारे यांनी आपले आई-वडील कै. इंदिराबाई व कै. गोपाळ पांडुरंग भांडारे यांच्या स्मरणार्थ गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर बेळगाव या संस्थेला 11 हजाराची दोनवेळा देणगी दिली आहे. इंदिराबाई यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त व गोपाळ भांडारे यांच्या 50 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांनी समाजाला ही देणगी दिली आहे. या रकमेच्या व्याजातून समाजातील गोरगरिबांना दरवषी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. याबद्दल संस्थेने त्यांचे आभार मानले आहेत.