‘राधे श्याम’च्या निर्मात्यांकडून चित्रपटाची घोषणा
दक्षिणेतील सुंदर अभिनेत्री अनुष्का शेट्टी आता प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत पुढील चित्रपट करणार आहे. या नव्या चित्रपटाची घोषणा अनुष्काच्या वाढदिवशी करण्यात आली आहे. अनुष्काने रविवारी स्वतःचा 40 वा जन्मदिवस साजरा केला आहे. 7 नोव्हेंबर 1981 रोजी ती मंगळूर येथे जन्मली होती.
प्रभास आणि अनुष्कासोबत चित्रपट निर्माण करणार आहोत अशी घोषणा निर्मात्यांनी केली आहे. दिग्दर्शक महेश बाबू पी यांचे दिग्दर्शन याला लाभणार आहे. तर युव्ही क्रिएशन्सकडून याची निर्मिती होणार आहे. ‘मिर्ची’ आणि ‘भागमथी’ हे चित्रपट अनुष्काने याच निर्मात्यांसोबत केले होते. लवकरच नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होणार आहे.
याचबरोबर अनुष्का शेट्टीनेही या नव्या चित्रपटाची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. दिग्दर्शक महेश बाबू पी यांच्यासोबतचा माझा पुढील चित्रपट येतोय याची घोषणा करताना मला आनंद होतोय असे तिने म्हटले आहे. अनुष्का यापूर्वी ‘निशब्दम’ या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिने आर. माधवन याच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती.