पावसापासुन बचावाकरिता दुचाकीला बसविले छत
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात पावसाला सुरूवात झाली असल्याने कमी जास्त पाऊस पडत आहे. परिणामी वाहनधारकांना वाहने चालविताना पावसाचा मारा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसापासुन बचाव करण्यासाठी एका वाहनचालकाने चक्क दुचाकी वाहनावर छत बनविले आहे. त्यामुळे शहरामधून फिरणाऱया या वाहनधारकांचा विषय चर्चेचा बनला आहे.
मागील आठवडय़ात पावसाला जोरदार प्रारंभ झाला होता. पावसाच्या माऱयामुळे दुचाकी वाहनधारकांना वाहने चालविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. रेनकोट घालूनही दुचाकी वाहनधारक पावसात भिजत प्रवास करावा लागतो. काही वेळा जोराच्या पावसाचा मारा तोंडावर बसत असल्याने वाहन चालविताना अडचण निर्माण होते. परिणामी अपघात घडत असतात. दुचाकी वाहनावरून ये-जा करीत असताना चालकासोबत मागे बसणाऱयांनादेखील पावसात भिजावे लागते. त्यामुळे पावसापासुन बचाव करण्यासाठी काहीजण चांगल्या प्रतिचे रेनकोट खरेदी करतात. तरीदेखील पावसात भिजावे लागते. त्यामुळे काही दुचाकी वाहनचालक पाऊस कमी होईपर्यत थांबण्याचा पर्याय निवडतात. पण व्यवसाय किंवा क्यवसायानिमित्त दुचाकी वरून फिरणाऱया नागरिकांना पाऊस आला म्हणून थांबता येत नाही. त्यामुळे एका कुरीअर पोच करणाऱया कामगाराने पार्सल सुरक्षित राहण्यासाठी आणि पावसापासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी दुचाकी वाहनावर चक्क छत बसविले आहे.
ऊन असो वा पाऊस कुरीअर पार्सल पोचविण्यासाठी दुचाकी फिरावे लागते. तसेच पावसात पार्सल भिजू नये याची खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांने दुचाकीवर छत बसवून पावसातही आपले कामकाज सुरू ठेवले आहे. दुचाकी वाहनावर छत लावून शहरात फिरणाऱया वाहनाकडे नागरिक औत्सुक्मयाने पाहत आहेत. तसेच चर्चेचा विषय बनला आहे.