प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलिसांनी शनिवारी हनुमाननगर येथील एका तरुणाला अटक केली आहे.
यल्लाप्पा नागाप्पा दोडमनी (वय 24, रा. हनुमाननगर) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर भा.दं.वि. 366 (ए), 376 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
15 वर्षे 2 महिने वयाच्या पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यल्लाप्पाचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. अपहरणानंतर त्याने त्या अल्पवयीन मुलीला बेंगळूरला नेल्याचे पोलिसांनी सांगितले.