अल् कायदाचे तालिबानला आवाहन, तालिबानमधील अंतर्गत संघर्षही उघड
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्यग्ना सैन्याला बाहेर जाण्यग्नास भाग पाडून तो देश ताब्यात घेतल्यासंदर्भात अल् कायदा या दहशतवादी संघटनेने तालिबानचे अभिनंदन केले आहे. तसेच आता इस्लामविरोधी शक्तींच्या हातून काश्मीर ताब्यात घ्यावे, असे आवाहनही केले आहे. तालिबानच्या काही नेत्यांनी मात्र, भारताची सहकार्य करण्यग्नाची भाषा केली असून काश्मीरप्रश्नी लक्ष घालणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अल् कायदाच्या आवाहनामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
तालिबानच्या पहिल्या राजवटीत अल् कायदाने अफगाणिस्तानात आश्रय घेतला होता आणि आपल्या कारवाया त्या देशातून चालविल्या होत्या. आता पुन्हा हा देश तालिबानच्या ताब्यात गेल्याने अल् कायदा सारख्यग्ना दहशतवादी संघटनांना नव्याने घुमारे फुटू लागले आहेत. यामुळे जगभरात दहशतवादी घटनांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता तज्ञ व्यक्त करीत आहेत. विविध देशांमधील दहशतवादी संघटनांचे बळ तालिबानच्यग्ना सत्तास्थापनेनंतर वाढेल अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
तालिबानमध्येच मतभेद
अमेरिकेने पूर्ण माघार घेतल्यानंतर आता काबूलमध्ये तालिबानकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यग्ना संघटनेचे विविध गट चर्चा करीत आहेत. मात्र, त्याचवेळी तालिबानमधील मतभेदही समोर येत आहेत. मुल्ला यग्नाकूब आणि हक्कानी नेटवर्कचे नेते यांच्यग्नात महत्वाचे विभाग मिळविण्यासाठी संघर्ष सुरु झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत अज्ञातवासात असणारे नेते हिबातुल्लाह अखुंदझादा हे सरकारचे सर्वोच्च धार्मिक नेते होतील अशी शक्यता आहे. तालिबानच्या प्रशासकीय मंडळात 11 ते 72 सदस्य असण्याची शक्यता आहे.
हक्कानी नेत्यांचे नियंत्रण काबूलवर आहे. तर मुल्ला याकूबच्या ताब्यात कंधार हा मोठा प्रांत आहे. याकूब यांचा प्र यत्न सरकारवर सैन्याचे वर्चस्व असावे असा आहे तर मुल्ला बरादर यांचा प्रयत्न सरकार राजकीय स्वरुपाचे असावे असा आहे. वरकरणी तालिबान एकत्र असल्याचा आभास निर्माण करीत आहे. मात्र, आतून मतभेद असल्याचे समोर येत आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.
तालिबानला विरोध सुरुच
तालिबान सरकार स्थापनेच्या तयारीत असला तरी त्याला काही प्रांतांमधून विरोधही होत आहे. बागलान प्रांतात तालिबानविरोधी दलांनी तीन जिल्हे ताब्यात घेतले आहेत. तर पंजशीर खोऱयात तालिबानचे 350 हस्तक मारले गेल्याचा दावा करण्यग्नात आला आहे. किमान 20 प्रांतांमध्ये स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात तालिबानविरोधी शक्ती एकत्र येत आहेत, असे प्रतिपादन करण्यग्नात आले.
अमेरिकेच्या शस्त्रांचे प्रदर्शन
अफगाणिस्तान सोडताना अमेरिकेने बरीच शस्त्रे आणि साधने मागे सोडली आहेत. ती सर्व आता तालिबानने ताब्यात घेतली असून अमेरिकेवरील विजयाचे प्रतीक म्हणून तालिबानच्या अनेक हस्तकांनी यग्ना शस्त्रांसह काबूलमध्ये संचलन केले. या संचलनात अमेरिकेची वाहने, काही हेलिकॉप्टर्स, गन्स आणि इतर साधनांचा समावेश होता. संचलनात भाग घेतलेल्यांनी अमेरिकाविरोधी घोषणा दिल्या. काही हस्तकांनी अमेरिकेच्या सैनिकांची प्रेतयात्रा काढून तालिबानचा विजय साजरा केला.
तालिबानकडून घटनेचा भंग ?
शांततेच आश्वासन तालिबानने दिले असले तरी अफगाणिस्तानातील परिस्थिती भिन्न आहे, असे विदेशी पत्रकारांनी स्पष्ट केले. या देशाच्यग्ना घटनेतील तरतुदींचा सरसकट भंग तालिबानकडून होत आहे. महिलांवर पुन्हा कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यांना समान अधिकार नाकारण्यात आले आहेत. महिलांचा आवाजही अनोळखी पुरुषाच्या कानावर पडू नये, असा आदेश काढण्यग्नात आला आहे. सहशिक्षण बंद करण्यात आले असून महिलांवर बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. रस्त्यावरुन घरातली महिला दिसू नये म्हणून प्रत्येक घराच्या तळमजल्यावरील खिडक्यांच्या काचा रंगविण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती अनेक विदेशी पत्रकारांनी दिली. अमेरिकेला साहाय्य करणाऱयग्ना अफगाण नागरीकांचा शोध घेतला जात असून त्यांना शरण या किंवा मरण्यास तयार व्हा, असा आदेश देण्यात आला आहे. अनेक अफगाण नागरीकांच्या मुलींचे अपहरण करण्यग्नात येत असून त्यांचे तालिबानी हस्तकांशी सक्तीने विवाह लावून देण्यात येत आहेत. घराघरातून 15 वर्षे वयापुढच्या मुलींचा शोध घेतला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे वरकरणी तालिबानी नेते शांततेचा आव आणत असले तरी त्यांचे हस्तक छोटी शहरे, खेडी आणि इतरत्र धुमाकूळ घालत आहेत, असे त्या देशातून बाहेर पडलेले अनेक अफगाण नागरीक सांगत आहेत.
बायडनकडून माघारीचे समर्थन
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी अफगाणिस्तानातून घेतलेल्या माघारीचे पुन्हा समर्थन केले आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी अमेरिकेची कृती यग्नोग्य असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या सैनिकांचे प्राण वाचविण्यासाठी ही कृती केली. अफगाणिस्तानात बदल करणे हे आमचे उद्दिष्ट नव्हते. 13 सैनिक काबूल विमानळावरील हल्ल्यात मारले गेले. तो अपवाद वगळता बहुतेक सर्व अमेरिकन नागरीक आणि अमेरिकेच्या समर्थकांना तेथून सुरक्षित बाहेर काढले गेले, असे प्रतिपादन त्यांनी केले. अफगाण संघर्षात अमेरिकेला अभूतपूर्व यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. आपला निर्णय योग्य आणि शहाणपणाचा होता, असे ठासून सांगण्याचा प्रयत्न जोसेफ बायडन यांनी या भाषणातून केला.