ऑनलाईन टीम / काबुल :
अमेरिकन बँकांमध्ये अफगाण सरकारचे कोट्यवधी डॉलर आहेत. ही रक्कम
तालिबान्यांच्या हाती पडू नये, यासाठी अमेरिकेन बँकांनी अफगाण सरकारची खाती सील केली आहेत.
अफगाण सरकारची बँकेतील संपत्ती तालिबानला देण्यात येणार नसल्याची घोषणा अमेरिकेकडून यापूर्वीच करण्यात आली होती. त्यानुसार टेझरी सेक्रेटरी जेनेट एल. येलन आणि ऑफिसर ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोलच्या टेझरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अफगाण सरकारची बँकेतील खाती सील केली.
अमेरिकन बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली असली तरीही अमेरिका अफगाणिस्तानला पूर्वीप्रमाणे मदत करेल, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहे.